विचार तैसे वर्तन ...
आमच्याकडे एक लॅब्राडोर कुत्रा होता. तो लहान असताना मी रोज फिरवायला घेऊन जात असे. पण हळूहळू तो मोठा झाला नी ताकदवान झाला. पण हे लॅब्राडोर कुत्रे दिसायलाच नुसते ताकदवान दिसतात. ॲग्रेसिव नसतात. प्रेमळ असतात तर कधी घाबरटपणाही करतात. सकाळी लवकर फिरायला जाताना रस्त्यावरची कुत्री मागे लागत असत. आणि ती कुत्री खूप जोरदारपणे भुंकत मागे लागायची , मला जाम भिती वाटायची . नी आमचाही कुत्रा घाबरून पळायला लागायला लागला की तो मलाच पळवत न्यायचा. मग ही सकाळची फेरी माझ्यासाठी नकोसं काम होऊ लागलं, ते मी टाळायचा प्रयत्न करायला लागले. घरातले बाकीचे सदस्य म्हणायचे आम्ही जातो तेंव्हा तो असे नाही करत. तू काहीही सांगतेस. या दरम्यान टीव्हीवर कोणत्यातरी चॅनलवर मिलान सिझर नावाच्या माणसाचा एक प्रॉब्लेमॅटीक कुत्र्यांना कसं समजून घ्यायचं नी कसा त्यांच्यात बदल घडवून आणायचा असा प्रोग्राम लागत असे. तो आम्ही सगळेच खूप आवडीने पाहायचो. त्यात एका एपिसोडमधे त्याने सांगितलं की कुत्र्याच्या मालकाच्या भावना कुत्र्याला कळतात. तुम्ही घाबरलात तर तोही घाबरतो. म्हणजे एका प्रॉब्लेमॅटीक कुत्र्याचे प्रकरण सोडवताना त्याने असा निष्कर्ष काढला की प्रॉब्लेम कुत्र्यात नसून मालकाच्या वर्तनात आहे. मग त्याचं त्याने प्रात्यक्षिकही करून दाखवलं . त्या मालकाच्या (मालकीण होती खरं तर ती ) वर्तनात हळूहळू बदल घडवून आणल्यावर त्या कुत्र्याच्या वर्तनातही फरक कसा पडला हेही सविस्तर दाखवलं. तो एपिसोड पाहील्यावर मला तर एकदम युरेका !! असच झालं. लगेच दुसर्या दिवशी मी मनाला समजवलं की रस्त्यावरची कुत्री दुरून भुंकतात नी जवळ येत नाहीत. घाबरायचं नाही. ठामपणे ठरवलं नी काय आश्चर्य माझी जशी भिती गेली तसा माझ्या देहबोलीत फरक पडला असेल. त्या दिवशी आमच्या कुत्र्याने पळापळ केली नाही. पहील्याच दिवशी फरक दिसल्यावर मला आत्मविश्वास आला आणि पुढेपुढे रस्त्यावरची कुत्री पण भुंकेनाशी झाली.
हेच खरंतर माणसांनाही लागू पडतं नाही का ?. आपण कुटूंबात कामाच्या ठिकाणी वावरत असताना आपल्या चेहर्यावरच्या भावावरून , देहबोलीवरून समोरचा माणूस नकळतपणे निष्कर्ष काढत असतो . याचे भान जर आपल्याला असले तर त्याचा ऊपयोग करून घेता येतो.( याचा ऊपयोग चोरही करतात बरं का ! हे साखळीचोर पर्सचोर बायकांची देहबोली बघूनच ठरवतात कुणाची साखळी ओढली किंवा पर्स ओढली तर आपल्याला कमीत कमी प्रतिकार होईल. ) एखादी गोष्ट दुसर्याला पटवून देताना ती स्वताला पटलेली असेल तरच तसे भाव आपल्या चेहर्यावर येतात आणि समोरच्याला नकळतपणे पटते . बोले तैसा चाले या धर्तीवर विचार तसे वर्तन.. तुम्ही जो विचार करता तो तुमच्या चेहेर्यावरून आणि देहबोलीतून रीफ्लेक्ट होत असतो. अर्थात यात काही वाकबगार असे अभिनेते असतात की जे पटलेले नसताना दुसर्याला पटवून देतात. पण तसे फार थोडे. विचार वर्तनातून दिसतात. वर्तन बदलले तर विचार भावना बदलतात किंवा या उलटही .. विवेकनिष्ठ विचारसरणी आपल्याला हेच शिकवते. मग विचार तपासा , वर्तन , भावना तपासा. काय बदलण्याची गरज आहे ते बघा नी सुरूवात करा. अपेक्षित परीणाम दिसणारच......
तात्पर्य -
ReplyDeleteमस्त
ReplyDeleteDeep thought written in simplified way
ReplyDeleteमाझाही हा असाच अनभव आहे.
ReplyDeleteकुत्री काय आणि माणसं काय ,एकसारखीच.
घाबरणार्याला घाबरवणारी...... आपण जेव्हां त्यांना डोळ्यात डोळे घालून संकेत देतो,कि मी तुला घाबरत नाही, तेव्हा समोरच्याचे आव्हान अर्धे संपत्ति.
Mam मी सुमन महाजन
ReplyDeleteछानच मांडले आहे तुम्ही