Sunday, December 20, 2020

प्रेम की बंधन

         


            कन्येने दोन छोट्या मांजरी घरी आणल्या . कन्या खूपच प्राणीप्रेमी. मांजरीतला एक बोका एक मांजरी . एकदोन महीन्यांच्याच . आईपासून तोडून आणलेलं  म्हणून मग घराचं दार कायम बंद ठेऊन त्यांना सांभाळायला लागत होतं. शीशू लीटर बॉक्समधे . दिवसभर एकमेकांच्या अंगावर ऊड्या मारणे एवढाच ऊद्योग. जरा दाराची फट ऊघडी राहीली तर बोका बाहेर जायला बघायचा. मग कन्येला म्हटले आता सोड हळूहळू बाहेर त्यांना. आमच्या घराच्या गेटच्या बाहेर एक मोठ्ठा बोका , असंख्य कुत्री असायचीच. त्यामुळे कन्या त्यांना बाहेर सोडायला तयार नाही.

" अग बाहेरच्या मांजरींची पिल्लं नाही का वाढत ? शिकतात ती हळूहळू " 

"  त्यांना आई असते सोबत. आणि मरतात सुद्धा पिल्लं  " 

"  मग तू कशाला आणलं आईपासून तोडून " 

"  मी आणलं तेंव्हा दोन महीने झालेले " 

"  मग सोड ना बाहेर त्यांना " 

"  नाही .मला कळतं कधी सोडायचं ते " 

(कन्या नुकतीच व्हेट पूर्ण झालेली.)

असे ऊलटसुलट तेच तेच गोल गोल संवाद होत काळ पुढे सरकला. बोकामांजर जरा संधी मिळाली की बाहेर धूमच ठोकायचा तर मनी संधी मिळून पण बाहेर जायची नाही. 

       एका आठवड्यात कन्येच्या कॉलेजमधल्या मैत्रिणी राहायला आल्या तेंव्हा त्यांनीही तीला सांगितलं किती दिवस तू त्यांना डांबून ठेवणार ?  तेंव्हा मग एके दिवशी मन घट्ट करून दार ऊघडं ठेवलं. बोका पळाला तो आजतागायत आला नाही. मनी अजून घरातचे. 

बोक्याला सोडताना कन्येची ईतकी घालमेल झाली की बस्स .   

      खरचं  मला प्रश्न पडला की तीचं मांजरावर असलेलं प्रेम आणि काळजी मोठी की जरा फट पाहून  ऊड्या मारत बाहेर धूम ठोकणार्या बोक्याच्या स्वातंत्र्याच्या आनंद मोठा ? प्रेम आणि प्रेमाचं बंधन याचं जाचात होणारं रुपांतर याच्या सीमारेषा पुसट असतात. माणसे एकमेकांवर प्रेम करता करता प्रेमाच्या तुरूंगातच टाकतात कधीकधी नकळतपणे ....

       मला एक साठीला टेकलेली मुलगी नी ८0 वर्षांची आई अशी प्रेमाच्या बंधनातली जोडी माहीते. मुलीला पहील्यापासून आईने प्रेमाच्या धाकातच ठेवलेलं त्यात मुलीचा घटस्फोट झाल्याने मुलगी तीच्या मुलीसकट आईकडेच राहीली नी प्रत्येक गोष्ट आई म्हणेल आईला आवडेल तशीच करत राहीली. नोकरी सुद्धा आईमुळेच केली. मला या वयात पण काय स्वैपाक करायचा हे आईला विचारावे लागते . मी कुठे चालले हे सांगून जावे लागते फार वेळ बाहेर राहीलेली तीला चालत नाही. नोकरी करत असताना पण घरी वेळेत जावे लागे अश्या बर्याच तक्रारी ही  साठीला आलेली मुलगी करत असे .

      आपण आपल्या प्रेमाच्या माणसांना नकळतपणे बंधनात टाकत नाहीये ना हा विचार प्रत्येकाने करायला हवा.नी या अशा  बंधनात टाकलेल्या व्यक्तीला आपणच निर्णयअक्षम दुबळं पण बनवत असतो  ...व्यक्तीच्या आपल्यापेक्षा भिन्न असलेल्या आचारविचारांना आणि निर्णयांना मान्य करून त्याचा आदर करणे हाही प्रेमाचाच भाग आहे नाही का ?


डॉ आनंदी साठये

मध्यस्थ

 मध्यस्थ                    फक्त दूरदर्शन होतं त्या जमान्यात एक मध्यस्थ नावाची टेलीफिल्म पाहिली होती. राजन भिसे ,अरूण जोगळेकर आणि लालनसारंग ...